जुन्या इमारतींचा सामूहिक विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) करावा म्हणून मुंबई, ठाणे, पुण्यापासून सर्वच महानगरांमधील राजकीय नेते आग्रही असण्यामागे मतदारांच्या हितापेक्षा या योजनेंतर्गत होणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या व्यवहारांवर या मंडळींचा जास्त डोळा असल्याचे मंत्रालयातील वर्तुळात बोलले जात आहे.
 ठाणे शहरात सामूहिक विकास योजना राबवावी म्हणून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी उपोषण केले. याच मागणीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते.
 ठाण्यातील काँग्रेस नेत्यांनीही याच मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला.  मुंबईतील झोपडय़ांच्या विकासाकरिता सामूहिक विकास योजना लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिले होते. मुंबईसाठी विशेष धोरण तयार करण्यात येत असतानाच ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आदी महापालिकांमध्ये मागणी पुढे आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्लस्टर विकास योजना आहे तरी काय?
जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या एखाद्या चाळ वा इमारतीच्या पुनर्विकासाकरिता जास्त चटईक्षेत्र निर्देशांक उपलब्ध होत नाही. मग या इमारतीचा पुनर्विकास विकासकाला फायदेशीर ठरत नसल्याने रखडतो वा काम करण्यास फारसे कोणी पुढे येण्यास तयार होत नाही. चार-पाच किंवा एखादा मोठय़ा इमारतींचा समूह म्हणून विकसित केल्यास त्यासाठी अधिक फायदे मिळतात, अशी माहिती ज्येष्ठ वास्तुविशारद अनंत गाडगीळ यांनी दिली. चार-पाच किंवा जास्त इमारतींच्या एकत्रित विकासात जादा चटईक्षेत्र निर्देशाकांबरोबरच व्यापारीकरणाकरिता जागा उपलब्ध होते. यामुळेच सामूहिक विकास योजनेसाठी मागणी वाढली आहे. मुंबई, ठाण्यात स्थावर मालमत्ता क्षेत्राकरिता पुरेशी जागा उपलब्ध राहिलेली नाही. यातूनच सामूहिक विकास योजना लागू झाल्यास जुन्या इमारतींचा पुनर्विकास होऊन विकासकांची चलती होऊ शकेल हे त्यामागचे गणित आहे.