१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या जखमा या मुंबईकरांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. या प्रकरणातला दोषी याकूब मेमनला २०१५ मध्ये फाशी देण्यात आली. याकूब मेमन हा बॉम्बस्फोटातील आरोपी होता. त्याच्या मुलीने जेव्हा पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज केला तेव्हा मीरा बोरवणकर यांनी तिला मदत केली होती. मॅडम कमिश्नर या पुस्तकात याविषयीचा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच ही मदत का केली हेदेखील मीरा बोरवणकर यांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या मीरा बोरवणकर?

याकूब मेमनला फाशी द्यायची की नाही यावर रात्रीच्या वेळी सर्वोच्च न्यायालय बसलं होतं. याकूबला फाशी दिली जावी यासाठी मला वरिष्ठ सांगत होते. मी त्यांना लेखी मागितलं किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ द्या असं मी त्यांना सांगितलं होतं. यानंतर याकूबच्या मुलीने पासपोर्टसाठी अर्ज केला. त्यावेळी मी तिला मदत केली. कारण बाप आरोपी आहे म्हणजे मुलांना शिक्षा का? त्यामुळे मी तिला मदत केली. कारण याकूब मेमनच्या मुलीला पासपोर्ट मिळणं हा नागरिक म्हणून तिचा अधिकार आहे. याकूब मेमनला फाशी देण्यात आली तेव्हा मीरा बोरवणकर या तुरुंग अधीक्षक होत्या. त्यांनी सांगितलं की त्याची मुलगी मला पासपोर्ट मिळावा म्हणून मदत मागायला आली होती ती मी केली. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

मीरा बोरवणकर याकूब मेमनच्या मुलीविषयी बोलताना म्हणाल्या की, तिला पासपोर्ट मिळणं हा तिचा नैतिक अधिकार आहे. मात्र ज्या पातळीवर तिला पासपोर्ट नाकारला होता. त्याच वेळी मी सांगितले होते की, जरी येथील प्रशासनाने तिला पासपोर्ट नाकारला असला तरी तिला तिचा पासपोर्ट न्यायालय मिळवून देईल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी त्यावेळीही आणि आता मांडली आहे.

अजमल कसाब आणि याकूब मेमनला ज्या काळात फाशी देण्यात आली होती. त्या काळातील राजकीय परिस्थिती वेगळी होती. कसाबला फाशी देण्याआधी प्रचंड गुप्तता बाळगण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही त्यासाठी पूर्णपणे गुप्तता पाळली असंही मीरा बोरवणकर यांनी या मुलाखतीत सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did you help yakub memon daughter for a passport meera borwankar said it was her right and there was nothing illegal in it scj