Why Is It Raining In November: राज्यातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी २५, २६, २७ व २८ नोव्हेंबरला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मागील दोन दिवस मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह व साधार ३० ते ४० किमी प्रति तास या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. आयएमडीच्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेने रविवारी (२६ नोव्हेंबरला) साधारण ९.२ मिमी पावसाची नोंद केली होती तर सांताक्रूझ वेधशाळेत ५.२ मिमी पाऊस नोंदवला गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोव्हेंबर महिन्यात पाऊस का पडतोय?

प्राप्त माहितीनुसार किनारपट्टीलगतच्या भागामध्ये चक्रीवादळ स्वरूपात वारे घोंगावत आहेत यामुळेच मुंबई व किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये पावसाचे ढग तयार होत आहेत. हे वारे महाराष्ट्राच्याच दिशेने पुढे जात असल्याने येत्या काही दिवसात पाऊस वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. राज्याच्या किनारपट्टी भागातून हा पाऊस पुढे सरकणार असून, आता हिवाळ्यातही पावसाळाच अनुभवावा लागणार आहे.

अवेळी पाऊस कसा ठरणार फायद्याचा?

दरम्यान, राज्यातील तापमानात काही अंशांची घट नोंदवण्यात येणार असून, कमाल तापमान सरासरी ३३ अंशांपर्यंत राहील मुंबईतील हवा जी मागील काही दिवसांपासून प्रदूषित होत असल्याने चिंता वाढली होती, ती या अवेळी पावसामुळे काही प्रमाणात शुद्ध होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे हा पाऊस मुंबईततरी काहीसा दिलासादायक असू शकतो. मात्र याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा<< ३० हत्तींच्या वजनाचा देवमासा ‘या’ गोष्टींनी ठरतो निसर्गाचा चमत्कार! गणपतीपुळ्यात देवमाशाच्या बाळाचा मृत्यू का झाला?

‘या’ जिल्ह्यात पावसाचे रौद्र रूप

हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळणार असून, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is it raining in november imd issues yellow alert of rain in next two days mumbai may get major rains weather today svs