Mumbai Blast Terrorist Yakub Memon Grave Renovation : दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या मुद्य्यावरुन टीका करणाऱ्या भाजपाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला समुद्रात दफन का नाही केलं? दफन केलं गेलं तेव्हा सरकार कोणाचं होतं?” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले. तसेच, “आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं आहे.” अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

… मग याकुबचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात का दिला?; उगाच शेपट्या आपटत बसू नका – अरविंद सावंत

“राजकारण व्हावं पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं याला मर्यादा असते. आज जे आरोप झाले ते खोटे आहेत. धार्मिक वाद निर्माण करायचं हे योग्य नाही.”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. तसेच, “सत्य परिस्थिती समोर येणं गरजेचं आहे. जेव्हा त्याचं दफन झालं तेव्हा मोठी सुरक्षा दिली होती, खूप गर्दी करून दफन करणयात आलं. ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं का नाही केलं? ते कब्रास्थान खासगी आहे. दफन झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं नक्की? ही ट्रस्ट प्रायव्हेट आहे हे त्यांना माहित नाही का?” असे सवालही आदित्य ठाकरे यांनी केले.

मोठी बातमी! दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई

“निवडणुक जवळ आल्या आहेत असे विषय पुढे येतायत. औरंगाबादवरून देखील असे विषय पुढे येत होते शेवटी माध्यमातून सत्य समोर आलं. आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं असत. बोलायला काहीही बोलू शकतात. २०१५ मध्ये आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा आमचं किती ऐकलं जात होतं.” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

याकूब मेमन कबर सुशोभिकरणावरून आदित्य ठाकरेंचा भाजपालाच प्रतिप्रश्न, म्हणाले…

काय आहे वाद?

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते. हा वाद समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या कबरीवरील एलईडी लाईट्स हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why not yakub memon was buried like laden was buried in the sea aditya thackerays question to bjp msr