दुधात कोणते घटक किती प्रमाणात असावेत याचे निकष निश्चित केलेले आहेत. गाय किंवा म्हैशीच्या दुधापासून स्निग्ध पदार्थ वेगळे करून त्यापासून चीज, लोणी, तूप, श्रीखंड, खवा असे अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे मूळ दुधातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाणात आवश्यकतेपेक्षा कमी होते. हे प्रमाण भरून काढण्यासाठी आणि उरलेल्या पातळ पाण्यात दुधात साखर किंवा ‘स्टार्च’ मिसळण्याचा उद्योग केला जातो. तूप, चीज, लोण्याचा एक किलोचा भाव आणि साखरेचा एक किलोचा भाव पाहता हे समीकरण कोटय़वधीचा नफा मिळवून देते.
दूधभेसळ दोन प्रकारे होते.
दुधात अधिक प्रमाणात पाणी मिसळल्याने साय आणि एसएनएफचे प्रमाण कमी होते. या दुधाला दुय्यम दर्जाचे दूध म्हणतात. दुसऱ्या प्रकारच्या भेसळीत घटकांचे प्रमाण वाढलेले दाखवण्यासाठी साखर, स्टार्च किंवा पामोलीन ऑइलसारखे पदार्थ वापरले जातात. या भेसळीमुळे ग्राहकांच्या आरोग्याला हानी पोहोचण्याची शक्यता असते.
दुधात साखर का टाकली जाते?
दुधात कोणते घटक किती प्रमाणात असावेत याचे निकष निश्चित केलेले आहेत. गाय किंवा म्हैशीच्या दुधापासून स्निग्ध पदार्थ वेगळे करून त्यापासून चीज,
आणखी वाचा
First published on: 17-12-2014 at 04:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why sugar mixed in milk