हैद्राबाद स्फोटानंतर मुंबईतील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिली. अजमल कसाब आणि अफजल गुरू यांच्या फाशीनंतर मुंबईत विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचेही ते म्हणाले. सीमा सुरक्षा दलाचे पोलीस महानिरीक्षक अशोक कुमार यांनी लिहिलेल्या ‘खाकीतील माणूस’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. हैदराबाद स्फोटानंतर मुंबईची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. परंतु नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले

Story img Loader