मुंबईः दागिन्यांवरून झालेला वाद आणि चारित्र्यावरील संशय़ावरून २५ वर्षीय महिलेची टॉवेलने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना मलबार हिल येथे घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या ३० वर्षीय पतीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

योगिता सुमीत वेदवंशी (२५) असे मृत महिलेचे नाव असून त्या मलबार हिल येथील कंबाला हिल हायस्कूल शेजारी असलेल्या शिवाजी नगरमध्ये पतीसोबत राहत होत्या.  पती सुमीत लक्ष्मण वेदवंशी (३०) याच्यासोबत बुधवारी योगिताचा वाद झाला होता. या वादातून  सुमीतने तिला मारहाण केली. त्यानंतर घरातील टॉवेलने योगिताचा गळा आवळला. योगिता खाली कोसळली असता तिला जवळच्याच एलिझाबेथ रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता तिचा मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपासाला सुरूवात केली. त्यानंतर योगिताची आई लक्ष्मी सुरेश नाडल (४५) यांचा जबाब नोंदवला असता सुमीतनेच मुलीची हत्या केल्याचे त्यांनी सांगितले.

Woman murdered in broad daylight in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
man killed his wife and son and create faked suicide
मुंबई : पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला, आरोपीला अटक
Case filed against women who brutally beat three-year-old son
तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आईविरोधात गुन्हा

हेही वाचा >>>Mumbai Voter Turnout : विधानसभा निवडणुकीत यंदा बोरीवलीत सर्वाधिक मतदान तर ‘या’ मतदारसंघाने पुन्हा केलं निराश; पाहा आकडेवारी

योगिताचे दागिने  सुमीतने त्याचा मित्र अभिषेककडे गहाण ठेवले होते. तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद व्हायचे. बुधवारीही असाच वाद झाला. त्यानंतर सुमीतने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली व त्यानंतर टॉवेलने तिचा गळा आवळला, अशी माहिती लक्ष्मी यांनी पोलिसांना दिली.  पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी सुमीतला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. आरोपीने हत्येसाठी वापरलेला टॉवेलही पोलिसांना सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस अधिक तपास करीत आहेत

Story img Loader