मुंबईः दागिन्यांवरून झालेला वाद आणि चारित्र्यावरील संशय़ावरून २५ वर्षीय महिलेची टॉवेलने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना मलबार हिल येथे घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या ३० वर्षीय पतीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
योगिता सुमीत वेदवंशी (२५) असे मृत महिलेचे नाव असून त्या मलबार हिल येथील कंबाला हिल हायस्कूल शेजारी असलेल्या शिवाजी नगरमध्ये पतीसोबत राहत होत्या. पती सुमीत लक्ष्मण वेदवंशी (३०) याच्यासोबत बुधवारी योगिताचा वाद झाला होता. या वादातून सुमीतने तिला मारहाण केली. त्यानंतर घरातील टॉवेलने योगिताचा गळा आवळला. योगिता खाली कोसळली असता तिला जवळच्याच एलिझाबेथ रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता तिचा मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपासाला सुरूवात केली. त्यानंतर योगिताची आई लक्ष्मी सुरेश नाडल (४५) यांचा जबाब नोंदवला असता सुमीतनेच मुलीची हत्या केल्याचे त्यांनी सांगितले.
योगिताचे दागिने सुमीतने त्याचा मित्र अभिषेककडे गहाण ठेवले होते. तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद व्हायचे. बुधवारीही असाच वाद झाला. त्यानंतर सुमीतने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली व त्यानंतर टॉवेलने तिचा गळा आवळला, अशी माहिती लक्ष्मी यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी सुमीतला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. आरोपीने हत्येसाठी वापरलेला टॉवेलही पोलिसांना सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस अधिक तपास करीत आहेत