पत्नीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या तरुणाची पतीने चाकून भोसकून हत्या केली. वडाळ्याच्या बीपीटी कॉलनी येथे सोमवारी रात्री ही घटना घडली.
बीपीटी कॉलनीतील गेट क्रमांक ६ मध्ये राहणाऱ्या चंदा शेख (१९) या विवाहितेचे त्याच परिसरात राहणाऱ्या कृष्णा प्रताप (२५) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. कृष्णाचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. चंदा शेखचा पती हुसेन शेख याला या प्रेमसंबंधांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याने विरोध केला होता. चंदाशी संपर्क ठेवू नकोस, असे त्याने कृष्णाला  वारंवार बजावले होते. पंरतु त्या दोघांचे संबंध सुरूच होते. त्यामुळे चिडलेल्या हुसेनने कृष्णाच्या हत्येचा कट आखला. सोमवारी रात्री त्याने आपला मित्र दिनेश आकोडे (२५) याच्या मदतीने कृष्णाची चाकूने भोसकून हत्या केली. वडाळा पोलिसांनी हुसेन व दिनेश यांना अटक केली आहे.

Story img Loader