राजधानी एक्स्प्रेस किंवा विमान प्रवासात मिळणारी मोफत मनोरंजनाची सुविधा आता राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाडय़ांमध्ये मोफत मिळणार आहे. एसटीच्या लांब पल्ल्याच्या सर्व गाडय़ांमध्ये लवकरच ‘क्वीक एन्टरटेनमेंट’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गाडय़ामंध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार एसटीतून प्रवास करतांना ‘स्मार्ट फोन’च्या माध्यमातून हवा तो कार्यक्रम, चित्रपट, नाटक वा गाणी पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे सुविधा निर्माण करण्याचे धोरण स्वीकारणाऱ्या परिवहन महामंडळाने शिवनेरीत दिल्या जाणाऱ्या मोफत वर्तमानपत्र सुविधेच्या एक पाऊल पुढे जात लांब पल्ल्याच्या एसटी गाडय़ांमध्ये प्रवाशांच्या सेवेत मनोरंजनाची मेजवानी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार ‘व्हॅल्युएबल’ ग्रुपचे अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने क्वीक एन्टरटेनमेंटची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. महामंडळावर कोणताही आर्थिक भार न पडता प्रवाशांना मोफत मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्वारस्य अभिव्यक्तीचे (एओआय) प्रस्ताव मागविण्यात आल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले.
प्रवाशांसाठी एसटीत मनोरंजनाची मैफल
राजधानी एक्स्प्रेस किंवा विमान प्रवासात मिळणारी मोफत मनोरंजनाची सुविधा आता राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाडय़ांमध्ये मोफत मिळणार आहे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-08-2015 at 06:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wifi in st buses