मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघरपासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेणपर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिवसेंदिवस पडणारा ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’सारखी हवाई सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

नवी दिल्ली येथे ७ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्ष्य प्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस महाराष्ट्राचे परिवहन म्हणून मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष भेट घेऊन मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ‘केबल कार’ प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकार द्वारे ‘पर्वतमाला परियोजना’ अंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने रोप वे विकसित करण्याचा मानस व्यक्त केला जाईल. या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (डीपीआर) तयार करणे गरजेचे आहे. त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी विशेष परवानगी देणे आवश्यक आहे, असे माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

BKC to Worli phase , metro mumbai ,
शंभर दिवसांत बीकेसी ते वरळी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करा, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
The Golden Road: How Ancient India
China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”
India before modernity
ना उजवा, ना डावा; का होतोय भारतीय इतिहासाच्या पुनर्लेखनाचा शास्त्रीय विचार?
mmrda loksatta
पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरच ‘मेट्रो १’च्या अधिग्रहणाचा निर्णय रद्द

हेही वाचा – मुंबई : शाहरुख खानची ‘मन्नत’ पूर्ण; बंगल्याचे दोन मजले वाढवण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी

मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, त्या तुलनेत अपुरी रस्ते व रेल्वे सेवा, वाढते प्रदूषण या कारणामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्चात देशातील यशस्वी झालेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

हेही वाचा – Raghav Tiwari Attecked: ‘क्राईम पेट्रोल’फेम अभिनेत्यावर मुंबईत हल्ला; कलाकाराने सांगितला धक्कादायक घटनाक्रम!

मुंबई महानगरास प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान, सागरी किनारा खाडीचा प्रदेश, एलिफंटासारखी प्राचीन लेणी, माथेरान सारखे थंड हवेचे पर्यटन स्थळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य यासारखी हरित पट्टे जतन करून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी रोप वेच्या माध्यमातून ‘केबल कार’ प्रकल्प राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. या प्रकल्पाचे महत्त्व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांना पटवून देऊन या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याची तत्वतः मान्यता घेण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

Story img Loader