उपनगरी प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या प्रकारे तिकिटे पुरविण्याच्या यंत्रणा कार्यान्वित केल्या असल्या तरी प्रवाशी मात्र खिडक्यांवरूनच तिकिटे खरेदी करू इच्छितात. रांगा कमी करण्यासाठी रेल्वेने सीव्हीएम, एटीव्हीएम आणि जेटीबीएस सुरू केली असली तरी प्रवासी मात्र खिडक्यांवरूनच तिकीटे काढण्यात धन्यता मानत आहेत.
मध्य रेल्वेवर दररोज साडेनऊ लाख प्रवासी तिकीटे काढून प्रवास करतात. त्यात खिडक्यांवर तिकिटे काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक साडेसहा लाख असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अतुल राणे यांनी सांगितले. च्
ाार वर्षांंमध्ये सीव्हीएम कुपन्स खरेदी करून तिकिटे घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून एटीव्हीएम आणि जेटीबीएसचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यंत धीम्या गतीने वाढत आहे. मात्र त्याचवेळी खिडक्यांवर तिकिटे खरेदी करणाऱ्यांची संख्या दोन लाखांनी वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सीव्हीएम कुपन्स खरेदी करणाऱ्यांची संख्या एक लाख असून एटीव्हीएमचा वापर करून तिकिटे काढणाऱ्यांची संख्या १.१५ लाख इतकी आहे तर जेटीबीएसद्वारे तिकीट काढणाऱ्यांची संख्या ९० हजार आहे.
उपनगरी रेल्वे तिकिटे देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून प्रवाशांना अतिरिक्त सोय उपलब्ध करून देण्याचा हेतू रेल्वे प्रशासनाचा आहे. मात्र नव्या पर्यायांना प्रवाशांनी विशेष पसंती दिली नसल्याचे राणे यांनी सांगितले.
तरीही तिकीट खिडक्यांनाच पसंती प्रवाशी इतर पर्यायांबाबत उदासिन
उपनगरी प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या प्रकारे तिकिटे पुरविण्याच्या यंत्रणा कार्यान्वित केल्या असल्या तरी प्रवाशी मात्र खिडक्यांवरूनच तिकिटे खरेदी करू इच्छितात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-05-2013 at 08:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Windos have preferd to collect ticket