राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त विजेते कलाकार, लेखक या सर्वानीच पुरस्काराबद्दल मनापासून आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केल्या.
उषा जाधव : लहानपणापासूनच मी अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. शाळा-महाविद्यालयात असतानाच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप धडपड केली होती. ‘धग’ चित्रपटासाठी मला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आपल्या अभिनयाची दखल थेट राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणे, हे माझ्यासाठी खूपच उत्साहवर्धक आहे. आज माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. मात्र हा पुरस्कार माझ्या एकटीचाच नाही. माझे दिग्दर्शक, सहकलाकार यांचाही यात मोलाचा वाटा आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे.
..आणि भ्रमणध्वनी खणखणले!
विक्रम गोखले: आज सकाळपासून मुंबईतच एका चित्रपटाच्या चित्रीकरणात खूप व्यग्र आहे. दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि भ्रमणध्वनी अव्याहतपणे खणखणायला लागला. खूप जणांनी अभिनंदन करण्यासाठी फोन केले. खूप शुभेच्छा संदेशही आले. मात्र माझ्या व्यग्र वेळापत्रकामुळे खूपच कमी लोकांशी प्रत्यक्षात बोलता आले. हा पुरस्कार मिळाल्यामुळे खूपच आनंद झाला आहे. इरफान खानबरोबर तो विभागून मिळाला आहे. इरफानबरोबर कधी काम करण्याचा योग आलेला नाही. मात्र तोदेखील दर्जेदार अभिनेता आहे. आता आणखी जोमाने काम करण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे.
जबाबदारी वाढली आहे
शिवाजी लोटन पाटील : धग’साठी सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर प्रचंड आनंद झाला आहे. कोणत्याही कलाकाराला एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यावर आनंद होणे स्वाभाविक आहे. मात्र आनंदापेक्षाही आता जबाबदारी वाढली आहे. यापुढे जे काही काम करेन, त्या कामाकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या असतील. पहिला चित्रपट करताना अपेक्षांचे ओझे अजिबात नव्हते. मात्र यापुढे ते सदैव राहणार आहे. मात्र मीही उत्तम चित्रपट देण्याचाच प्रयत्न करेन. पुढील चित्रपटांनी लोकांची अपेक्षा पूर्ण केली नाही, तर मी पुन्हा आहे त्याच पातळीवर येऊन पोहोचेन.
आशय मांडण्याच्या प्रयत्नाला दाद रत्नाकर मतकरी : सिनेमाचे जे ठराविक ग्रामर असते त्याचा किंवा तथाकथित ग्लॅमरस गोष्टींचा आधार न घेता आम्हाला हवा तो आशय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो आमचा प्रामाणिक प्रयत्न होता त्याला मिळालेली ही दाद आहे. हा चित्रपट करताना व्यावसायिक यश मिळावे म्हणून कोणत्याही प्रकारची तडजोड आम्ही केली नव्हती. चित्रपटाशी लोकांचे जडले जाणे आणि प्रेक्षकांना चित्रपटाने धरून ठेवणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये त्या उत्तमरित्या साध्य झाल्या. हे आव्हान चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पेलून धरल्यामुळेच आजचे यश मिळाले आहे. सिनेमॅटोग्राफ र म्हणून अमोल गोळेचे उत्तम काम, साऊंडवर झालेले काम, आमच्या निर्मात्यांनी टाकलेला विश्वास, तुषार दळवी-सुप्रिया विनोद पासून बालकलाकार प्रहर्ष नाईकपर्यंत सगळ्यांचा उत्कृष्ट अभिनय या सगळ्या गोष्टी जमून आल्या. एखादी कलाकृ ती असावी त्याप्रमाणे सगळ्या टीमने हे काम केले त्यामुळे चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हे या सगळ्यांचे यश आहे.
मतकरींचे स्वप्न पूर्ण
सुप्रिया विनोद : चित्रपट दिग्दर्शनाची आस बाबा खूप वर्षांपासून मनात बाळगून होते. आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी त्यांनी जिद्दीने हे स्वप्न पूर्ण केले. या चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार ही त्यांच्या जिद्दीला मिळालेली दाद आहे. बाबा नेहमी म्हणत, की मी आधीच गुरुदत्तसारखा संसार सोडून पळून जायला हवे होते. त्यांची आस आम्हाला जाणवत होती पण तरीही त्यांनी घरसंसार सांभाळून आज मोठया जिद्दीने आपली ही इच्छा पूर्ण केली आहे.
दुसरा आनंद नाही
भावेश मंडालिया : पहिल्याच चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळणे यासारखा दुसरा आनंद नाही. तेही आमच्याबरोबर ‘पानसिंग तोमर’, ‘विकी डोनर’सारखे चांगली कथा असलेले चित्रपट होते. त्यातून आमची निवड झाली. ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट म्हणजे एकप्रकारे ब्रॅंड झाला आहे आणि या चित्रपटाच्या यशामुळेच आज पटकथा लेखक म्हणून मला आणि दिग्दर्शक उमेश शुक्लाला इंडस्ट्रीत ओळख मिळाली आहे. आज या यशामुळे चांगल्या चित्रपटांवर मला काम करायला मिळेल, याचाही आनंद वाटतो आहे.
पुन्हा एकदा तोच थरार!
मंगेश हाडवळे : या आधी माझ्या ‘टिंग्या’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘मंगेश हाडवळे गेला कुठे,’ अशी चर्चाही सुरू झाली होती. पण मी या मधल्या काळात अनेक टीव्ही जाहिराती आणि कॉर्पोरेट फिल्म्स केल्या. याच दरम्यान लहान मुलांसाठी ‘देख इंडियन सर्कस’ हा बालपट लिहिला आणि दिग्दर्शनही केले. या चित्रपटाला यंदा सवरेत्कृष्ट बालपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर तनिष्ठा चटर्जी आणि नवाझुद्दिन सिद्धिकी या कलाकारांसह बाल कलाकारालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. आता ‘टिंग्या’च्या वेळी अनुभवलेला थरार पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
स्वप्न सत्यात उतरले!
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त विजेते कलाकार, लेखक या सर्वानीच पुरस्काराबद्दल मनापासून आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केल्या. उषा जाधव : लहानपणापासूनच मी अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. शाळा-महाविद्यालयात असतानाच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप धडपड केली होती. ‘धग’ चित्रपटासाठी मला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
First published on: 19-03-2013 at 04:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winning national award like dream come true