चिपळूण येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपास गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही तेव्हा उपस्थित राहणार आहेत.
समारोपास मनोहर पर्रिकर यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती संमेलन संयोजन समितीने केली होती. त्या विनंतीस मान देऊन पर्रिकर यांनी समारोपाला येण्याचे मान्य केले आहे.
संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात एकाच वेळी दोन राज्यांचे मुख्यमंत्री प्रथमच उपस्थित राहणार आहेत, असा दावा संमेलन आयोजकांकडून करण्यात आला
आहे.
दोन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चिपळूण साहित्य संमेलनाचा समारोप
चिपळूण येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपास गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही तेव्हा उपस्थित राहणार आहेत. समारोपास मनोहर पर्रिकर यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती संमेलन संयोजन समितीने केली होती. त्या विनंतीस मान देऊन पर्रिकर यांनी समारोपाला येण्याचे मान्य केले आहे.
First published on: 12-12-2012 at 04:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With two chief minister chiplun sahitya samelan closeing ceremony is done