मराठवाडा आणि अन्य भागांतील दुष्काळग्रस्तांविषयी संवेदनशीलता बाळगत यंदा मुंबईकरांनी पाण्याचा अपव्यय टाळून कोरडी धुळवड साजरी केली. यंदा धुळवडीच्या उत्सवावर महापालिकेचे नियंत्रण राहिल्याने यंदा मुंबईकरांनी पाण्याचा एकही टँकर धुळवड खेळण्यासाठी मागविला नसल्याचेही समोर आले आहे. एरवी ठिकठिकाणी रेन डान्स आणि पाण्याने भरलेले फुगे मारणारे नागरिक फुलांच्या, नैसर्गिक रंगांच्या साहाय्याने धुळवड खेळताना दिसून आले.
मुंबई-ठाण्यातील अनेक सोसायटय़ांमध्ये गेल्या आठवडय़ापासून ‘पाणी वाचवा’ संदेश देणारी भित्तिपत्रके लावण्यात आली होती, तर महाराष्ट्रातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव लक्षात घेता मराठी कलाकरांनीदेखील यंदा धुळवड न खेळण्याचा निर्णय घेतला. आयोजकांनी सर्व कलाकारांच्या संमतीने ‘पाणी वाचवा’ मोहिमेत सहभागी होत धुळवडीचा कार्यक्रम रद्द केला. याबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी अनेक महाविद्यालयांमध्ये जलजागृती अभियान राबविले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘पाणी वाचवा’ मोहिमेमध्ये सहभागी होत महाराष्ट्रातील भीषण वास्तव स्थानिकांसमोर मांडले. या मोहिमेचा परिणाम यंदा धुळवडीत दिसून आला आणि पाण्याचा वापर न करता मुंबईकरांनी कोरडी होळी साजरी केली.
समाजमाध्यमे, राज्य सरकार, महापालिका यांच्याकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकरांनी केवळ रंगांची उधळण करूनच धुळवडीचा आनंद साजरा केला.

तापमानात वाढ
होळीपासून उन्हाळ्याला सुरुवात होते या पारंपरिक समजुतीला अनुकूल ठरणारे तापमान बुधवारी नोंदले गेले. मुंबईत २३ मार्च रोजी तब्बल ३८.२ अंश से. कमाल तापमान होते. या ऋतूमधील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. धूलिवंदनाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी तापमानात पाच अंश से.ने घट झाली असली तरी पुढील तीन दिवस तापमान चढेच राहील.

Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
Will water supply in Wardha remain shut indefinitely
वर्ध्यात पाण्यासाठी हाहा:कार! पाणीपुरवठा बेमुदत बंद राहणार ?
Opposition protests in Legislative Assembly area on issue of getting guaranteed price for farmers
कापूस, धान, सोयाबीनच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विधान भवन परिसरात…
Ganesh Naik Minister post , Navi Mumbai water,
गणेश नाईकांच्या मंत्रिपदामुळे शहराला वाढीव पाण्याची आस, बारवी धरणाचे पाणी मिळण्याची आशा बळावली
Rejuvenation of Poisar River
पोयसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त, तब्बल दोन वर्षांनी प्रकल्पाला वेग येण्याची शक्यता
Mango , Amaravati Mango, Vidarbha Mango,
यंदा आमरस जोरात, दरही कमी होणार; कडाक्याच्या थंडीमुळे आंबेमोहोर…

दबाव आणि पुढाकार
पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी सुमारे २५
हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा वापर आणि छेडछाडीच्या घटनांवर नियंत्रण होते. त्याबरोबरच मोठमोठी गृहसंकुले आणि सोसायटय़ांतील सदस्यांनीही पुढाकार घेत रेन डान्सवर बंदी आणत कोरडय़ा रंगांनी धुळवड साजरी केली.

Story img Loader