उमाकांत देशपांडे

मुंबई : महावितरण कंपनीत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, यासाठी यवतमाळमधील अनुसूचित जमातीची महिला गेली १२ वर्षे संघर्ष करीत असून नोकरीनिमित्त परगावी राहत असलेल्या भावाने वडिलांच्या मृत्यूनंतर विलंबाने शिधापत्रिका स्वतंत्र केल्याचे कारण देत महावितरणने त्याच्या बहिणीस नोकरी देण्यास विरोध केला आहे. राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने महावितरणचा दावा फेटाळून लावत या महिलेला नोकरी देण्याचे आदेश गेल्या वर्षी दिले असून कंपनीने त्याची अंमलबजावणी केलेली नाही.

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…

 उदेभान मेघने हे महावितरणच्या यवतमाळ विभागात कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करीत असताना १ जून २०१० रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचा थोरला मुलगा चंद्रशेखर मेघने हे कोल्हापूर विभागात इचलकरंजी येथे कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करीत होते. उदेभान यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी व तीन मुली यवतमाळला असून आपण परगावी असल्याने त्यांचा सांभाळ करणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र मुलगा चंद्रशेखर यांनी महावितरण कंपनीकडे दिले आहे. उपजीविकेसाठी मुलगी सविता यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, यासाठी त्यांनी महावितरणकडे अर्ज दिला होता. त्या यवतमाळला महावितरणमध्ये मोबदला तत्त्वावर (महिन्यातील काही दिवस) काम करीत आहेत. मात्र त्यांना महावितरणने सेवेत सामील करून घेतलेले नाही. त्यामुळे सविता व त्यांच्या आई पंचफुला यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे गेल्या वर्षी अर्ज केला.

त्यावर आयोगाने सविता यांना सेवेत घेण्याचे आदेश ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दिले. चंद्रशेखर हे वडिलांच्या मृत्यूपूर्वी महावितरणच्याच सेवेत इचलकरंजी येथे असताना यवतमाळ येथील शिधापत्रिकेतील त्यांचे नाव त्यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर कमी केले, हे सविता यांना नोकरी नाकारण्याचे सयुक्तिक कारण ठरू शकत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने सविता यांच्यातर्फे ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनाही निवेदन देण्यात आले आहे. ही धोरणात्मक बाब असून याबाबत प्रस्तावावर कार्मिक (एचआर) विभागाचे संचालक निर्णय घेतील, असे महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले.