मुंबई : ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या ५९ वर्षीय तारा उमेश साबळे यांनी विधानभवना जवळील उषा मेहता चौकानजिक मंगलवारी सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने ब्लेडने हातावर मारून घेतले. त्या ती किरकोळ जखमी झाली. तिला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले. तारा कांबळे यांनी सदनिका नावावर करण्यासाठी निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. पण कायदेशिरमार्गाने ते शक्य नसल्यामुळे तिला न्यायालयत खटला दाखल करण्यास सांगण्यात आले होते. यासंदर्भात त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे चौकशीत सांगितले. महिलेला पोलिसांनी जी. टी. रुग्णालयात नेले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
विधान भवनाजवळ महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
महिलेला पोलिसांनी जी. टी. रुग्णालयात नेले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-07-2024 at 21:15 IST | © The Indian Express (P) Ltd
TOPICSआत्महत्याSuicideमहाराष्ट्र विधान परिषदMaharashtra Legislative CouncilमुंबईMumbaiमुंबई न्यूजMumbai News
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman attempts suicide in front of maharashtra vidhan bhavan mumbai print news zws