सराईतपणे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिलांच्या एका टोळीला ठाणे पोलिसांनी नुकतीच अटक केली. एसटीमधून प्रवास करीत असताना या महिलांनी एका सहप्रवाशी महिलेच्या पर्समधील मंगळसूत्र चोरले. मात्र वाहतूक पोलिसाने या बसचा पाठलाग करीत ही बस अडवली आणि या तीनही महिलांना अटक केली. या महिलांना राबोडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भिवंडी येथून सुनीता ठाकरे या एसटीने ठाण्याला निघाल्या होत्या. माणकोली येथे तीन महिला या बसमध्ये चढून ठाकरे यांच्या जवळ बसल्या. त्यांनी प्रवासादरम्यान ठाकरे यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरले. ही बस ठाण्यातील मुक्ताई आगार परिसरात आल्यानंतर सुनीता ठाकरे या बसमधून उतरल्या, मात्र मंगळसूत्र चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या भागात वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या शिवाजी पवार यांना ही माहिती दिली. पवार यांनी बसचा पाठलाग करून ऋतुपार्क क्रॉस रोडवर ही बस थांबवली. पवार यांनी चौकशी केल्यानंतर या बसमधील कल्याणी एन्तिकल्लू या महिलेनेच मंगळसूत्र बाहेर फेकल्याचे उघड झाले. पवार यांनी तिच्यासह तिच्या सहकारी अन्नपूर्णा एन्तिकल्लू व सोनी एन्तिकल्लू यांना ताब्यात घेतले आणि राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman chain snatcher arrested