मुंबई : कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी पतीला वश करण्याच्या नावाखाली विवाहित महिलेची सुमारे ५९ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍याला तिघांपैकी एकाला पवई पोलिसांनी अटक केली. प्रसाद दर्जी गाला ऊर्फ परेश गडा असे अटक आरोपीचे नाव असून या गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एका ज्योतिषाचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अंधेरीमधील मरोळ परिसरातील मिलिटरी रोडवर राहणारे ३९ वर्षांच्या तक्रारदारांचा कार्टेज आणि छपाईचा व्यवसाय आहेत. पत्नी आणि दोन मुलांसह ते अंधेरी येथे राहात होते. दिवाळीत तक्रारदारांना त्यांच्या कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देण्यासाठी, तसेच इतर कामासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे १३ ऑक्टोबरला त्यांनी ३५ लाख रुपये आणून त्यांच्या घरातील कपाटात ठेवले होते. या पैशांबाबत त्यांच्या पत्नीला माहीत होते. पाच दिवसांनी त्यांना कपाटात पैसे सापडले नाहीत. यावेळी त्यांनी पत्नीकडे चौकशी केली.

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
two unidentified men robbed gold chain from woman
बोलण्यात गुंतवून वृद्ध महिलेची सोनसाखळी पळवली
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…

हेही वाचा: Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकामावर अखेर हातोडा

तिने तिच्या दिराला घरातील कौटुंबिक वाद आणि पतीकडून होणार्‍या अपमानास्पद वागणुकीबद्दल सांगितले. यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. तिची इंन्स्टाग्रामवर ज्योतिषी बादल शर्मा याच्याशी ओळख झाली होती. त्याने जादूटोण्याच्या माध्यमातून पतीला वश करता येईल असे सांगून तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. हा प्रकार तिने मित्र परेश गडाला सांगितला. त्याच्या मध्यस्थीमुळे ती बादलच्या संपर्कात आली होती. त्यामुळे तिने परेशला ३५ लाखांसह घरातील साठ तोळ्याचे सोन्याचे दागिने दिले.

हेही वाचा: “आज बाळासाहेब असते तर या…”; भाजपाने ढोंगाशी ‘निकाह’ लावल्याचा टोला लगावत शिवसेनेनं CM शिंदेंना केलं लक्ष्य

परेशने फसवणुकीच्या उद्देशाने तिची बादलशी ओळख करून तिच्याकडील पैसे आणि सोन्याचे दागिने असा ५९ लाखांचा मुद्देमालाचा अपहार केला. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच या व्यापार्‍यांनी दोघांविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच परेश गडा याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी बादलचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्याचा शोध सुरू आहे.