मुंबई : लालबागमधील एका सदनिकेत महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लालबागमधील पेरू कंपाउंड परिसरातील एका सदनिकेत प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेला ५० ते ५२ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेचे नाव वीणा प्रकाश जैन असे आहे. या महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत सापडला. या घटनेची माहिती रात्री उशिरा पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविला. काळाचौकी पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – “ज्या ‘महाशक्ती’चं नाव तुम्ही उठताबसता घेता, ती…”; जुन्या पेन्शन योजनेवरून ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर हल्लाबोल!

हेही वाचा – अखेर कोनमधील घरांच्या दुरुस्तीसाठी निविदा जारी

या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. एवढेच नव्हे तर महिलेच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. तसेच तिचे हात, पाय आणि शरीराचे अन्य भाग कापण्यात आले होते असे समजते. रात्री उशिरा न्यायवैधक पथकाला पाचारण करून संपूर्ण सदनिकेची तपासणी करण्यात आली असून हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.