मुंबई : कंपनीतील सहकर्मचाऱ्यांसह बदलापूर येथे ट्रेकिंगला गेलेल्या एका तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शादाब खान या सहकारी कर्मचाऱ्याविरुद्ध सहार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तरूणी सदनिकेत एकटी असल्याचा फायदा घेऊन शादाबने तरुणीशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>> धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सर्वांचे धारावीतच पुनर्वसन करा, मुंबई बचाव समितीची मुख्यमंत्र्यांकडे चर्चेची मागणी

Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू

चौवीस वर्षीय तक्रारदार तरुणी ही मूळची गुजरातच्या वापी येथील रहिवासी असून गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईत राहते. तिच्या परिसरातील एका खाजगी कंपनीत ती पुरवठा विभागात कामाला आहे. तिच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी १ जुलैला बदलापूरच्या कोंडेश्वर येथे ट्रेकिंगला जाण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे ६ जुलैला ती तिच्या मित्र-मैत्रिणींसह बदलापूर येथे मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी ट्रेकिंगला जाणार होती. शनिवारी सहा वाजता ते सर्वजण बदलापूरला गेले. रात्री ते सर्वजण दोन सदनिकांत मुक्कामी होते.

हेही वाचा >>> १२ वर्षांच्या मुलीचे वाडिया रुग्णालयात अवयवदान! चार रुग्णांना दिले जीवनदान…

एका सदनिकेत तिच्या इतर सहकाऱ्यांसह शादाबही होता तर इतर सहकारी दुसऱ्या सदनिकेत होते. दुसऱ्या दिवशी तिला अभयने ट्रेकिंगला जाण्यासाठी उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र झोप येत असल्याने तिने ट्रेकिंगला जाण्यास नकार दिला. ते सर्वजण निघून गेल्यावर सदनिकेत ती आणि शादाब दोघेच होते. काही वेळानंतर त्याने तिला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. या प्रकाराने तिला धक्काच बसला. तिने त्याला जाब विचारला व ती तिची बॅग भरुन सदनिकेबाहेर निघून गेली. घडलेला प्रकार तिने तिच्या मित्रांना सांगितला. त्यानंतर ते मुंबईत आले. दोन दिवसानंतर तिने तिच्या कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाला कंपनीच्या लैंगिक छळवणूक प्रतिबंधक समितीला घडला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी तिला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने सहार पोलिसांत शादाब खानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.