गोरेगावमधील एका मॉलमधील सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे एक महिलेला तिचा हजारो रुपयांचा ऐवज परत मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दादरमध्ये राहणाऱ्या पूजा वालावलकर या २५ ऑगस्टला दहीहंडी पाहण्यासाठी गोरेगावला गेल्या होत्या. घरी जाण्यासाठी रात्री ११.३०च्या सुमारास त्या खासगी टॅक्सी नोंदविण्याकरिता म्हणून गोरेगावमधील ऑबेरॉय मॉलच्या आवारात उभ्या होत्या. गडबडीत त्यांनी आपली पर्स शेजारी उभ्या असलेल्या एका गाडीच्या बोनेटवर ठेवली आणि त्या तिथेच विसरून गेल्या. घरी पोहोचल्यावर त्यांना पर्स हरविल्याचे लक्षात आले. या पर्समध्ये सोन्याच्या कानातल्या रिंगा, काही पैसे असा एकूण ३४,००० रुपयांचा ऐवज होता.

ती पर्स रात्री ऑबेरॉय मॉलमध्ये काम करणाऱ्या शरद ठाकरे यांना मिळाली. त्यांनी पर्सच्या मालकिणीशी संपर्क साधता यावा म्हणून एखादा फोन नंबर किंवा पत्ता सापडतो का यासाठी पर्स चाचपडली. मात्र त्यात काहीही नव्हते. मग शरद यांनी ती पर्स मॉलमध्ये हरवलेल्या वस्तूंमध्ये जमा केली. दुसऱ्या दिवशी पूजा यांनी िदडोशी पोलीस ठाणे गाठून एनसी दाखल केली. पोलिसांनी मॉलमध्ये विचारणा केली असता पर्स हरविलेल्या वस्तूंमध्ये सापडली.

आमच्या येथे अनेक वेळा असे प्रकार घडतात. मात्र आमच्या मॉलमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी प्रामाणिक असल्याने आतापर्यंत ज्या लोकांच्या वस्तू हरवल्या त्या त्यांना परत मिळाल्या. तसेच अशा हरवलेल्या वस्तू आम्ही स्वत:जवळ तीन दिवस सांभाळून ठेवतो. नंतर त्या पोलिसांच्या ताब्यात देतो, असे ऑबेरॉय मॉलच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

पर्स हरवल्याचे माझ्या लक्षात आल्यावर पर्स परत मिळणार नाही असाच विचार माझ्या मनामध्ये येत होता. मात्र पोलिसांच्या आणि मॉलच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मला सर्व वस्तू परत मिळाल्या. यातील एकही वस्तू गहाळ नव्हती. ठाकरे यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून माझी पर्स सांभाळून ठेवली होती.

– पूजा वालावलकर