चालत्या उपनगरी गाडीत बाळंत झालेल्या महिलेस इस्पितळात पोहंचविण्यासाठी आणलेल्या रुग्णवाहिकेचे भाडे देण्यास भाईंदर रेल्वे स्थानकप्रमुखांनी नकार दिल्याने अखेर रेल्वे पोलिसांवरच त्या रुग्णवाहिकेचे भाडे भरण्याची वेळ आली.विरार येथील ग्लोबल पार्क येथे सुरू असलेल्या बांधकामावर मजूर असलेल्या सय्यप्पा राठोड याची पत्नी लक्ष्मी (२२) हिला बाळंतपणासाठी बोरिवलीच्या भगवती इस्पितळात नेण्यात येत असतानाच भाईंदर स्थानकात गाडी आली असता दुपारी १२.५० वाजता कळा सुरू झाल्या आणि गाडीतच तिने मुलीस जन्म दिला. नंतर त्या महिलेस तात्काळ इस्पितळात हलविण्यासाठी स्थानकप्रमुखांकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आवश्यक होते. तथापि, भाईंदरचे स्थानकप्रमुख अशोककुमार यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्या महिलेस इस्पितळात नेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांचीही पूर्तता त्यांनी केली नाही. अखेर रेल्वे पोलिसांनीच पुढाकार घेत त्या महिलेस, तिच्या नवजात मुलीसह जवळच्या साईबाबा इस्पितळात नेले. मात्र त्यांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. शेवटी मीरा-भाईंदर येथे असलेल्या शाह लाइफ लाइन इस्पितळामध्ये तिला दाखल करण्यात आले.
रेल्वेत बाळाचा जन्म : स्थानकप्रमुखाच्या निष्क्रियतेने महिलेचे हाल
चालत्या उपनगरी गाडीत बाळंत झालेल्या महिलेस इस्पितळात पोहंचविण्यासाठी आणलेल्या रुग्णवाहिकेचे भाडे देण्यास भाईंदर रेल्वे स्थानकप्रमुखांनी नकार दिल्याने अखेर रेल्वे पोलिसांवरच त्या रुग्णवाहिकेचे भाडे भरण्याची वेळ आली.
First published on: 30-12-2012 at 02:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman gives birth on local train