मुंबई: चेंबूर कॉलनी येथे सोमवारी सकाळी एका घराची भिंत कोसळून महिला गंभीर जखमी झाली. सध्या या महिलेवर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असून चेंबूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!
हेही वाचा – वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल
हेही वाचा – साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
चेंबूर कॉलनी परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून त्यामुळे वर्षातून दोन ते तीन वेळा या भागात घर कोसळल्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी सकाळी अशाच प्रकारे तेथील एमएस इमारतीला लागून असलेल्या एका दुमजली घराची भिंत कोसळली. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती चेंबूर पोलीस आणि अग्निशमन दलाला दिल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रेणुका (३०) ही महिला तेथे अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ ढिगारा बाजूला करून महिलेला सुखरूप बाहेर काढून गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.