भांडुपच्या रमाबाई नगरमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याने या विभागात एकच खळबळ उडाली. ही महिला याच परिसरात राहात असल्याचे उघडकीस आले असून पतीनेच तिचा खून केला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रमाबाई नगरात पाणी भरण्यासाठी सकाळी सहाच्या सुमारास लगबग सुरू होते. नेहमीप्रमाणे महिला पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडल्या असता त्यांना स्नेहल बाळकृष्ण नवलेकर हिचा मृतदेह आढळला.बाळकृष्ण नेवलेकर पत्नी स्नेहल आणि दोन मुलांबरोबर गेल्या काही वर्षांपासून रमाबाई नगरात वास्तव्यास होते. या दाम्पत्याची वरचेवर भांडणे होत होती. भांडणांना कंटाळून त्यांचा मोठा मुलगा आजीकडे राहावयास गेला.

Story img Loader