मुंबई: एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चोराने खेचून पळ काढल्याची घटना बुधवारी सायंकाळी कुर्ला आणि घाटकोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अज्ञाच चोराविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.सुनंदा हेचमांडी (४१) असे या महिला प्रवाशाचे नाव असून त्या मुळच्या कर्नाटक राज्यातील उडपी येथील रहिवासी आहेत. त्या बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कर्नाटकमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायंकाळी ६ च्या सुमारास त्या मस्यगंधा एक्सप्रेसमध्ये बसल्या. गाडी घाटकोपर आणि कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान येताच एका चोराने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचले. त्यानंतर आरोपी चालत्या गाडीमधून खाली उतरून घाटकोपरच्या दिशेने पळून गेला.महिलेने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी महिलेला कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेले. तेथे महिलेच्या तक्रारीवरून कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman passenger gold mangalsutra stolen in moving express train mumbai print news zws