मुंबईतलं दादर हे अत्यंत गजबजलेलं स्टेशन असतं. गर्दी तर इथे कायमच पाहण्यास मिळते. याच दादर स्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधल्या महिलेला एका माणसाने चालत्या ट्रेनमधून ढकललं. ही महिला २९ वर्षांची आहे सुदैवाने ती बचावली आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपीला अटकही केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी काय घडली घटना?

उद्यान एक्स्प्रेसच्या लेडीज डब्यात २९ वर्षांची महिला एकटी असल्याचं पाहून तिला लुटण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्यावर हल्ला केला. मात्र या महिलेने आरोपीला प्रतिकार केला. ज्यानंतर आरोपीने या महिलेला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिलं. रविवारी म्हणजेच ६ ऑगस्टच्या दिवशी ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हे पण वाचा- पुण्यातील दहशतवादी प्रकरण ‘एनआयए’कडे; ‘आयसिस’शी लागेबांधे असल्याचे उघड

दादर स्टेशनवर जेव्हा उद्यान एक्स्प्रेस आली तेव्हा लेडीज डब्यातल्या सगळ्याच महिला खाली उतरल्या. एकच महिला डब्यात बसली होती. तिला एकटीला पाहून आरोपी त्या डब्यात शिरला. यावेळी महिलेने त्या आरोपीशी झटापट करत त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत ट्रेन सुरु झाली होती. या सगळ्यात आसोपीने तिला खाली ढकललं. सुदैवाने ही महिला प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र ती जखमी झाली होती आणि तिची शुद्धही हरपली होती. पोलिसांनी या हल्लेखोराला सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आरोपी या महिलेची बॅग खेचण्याचा प्रयत्न करत होता. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- नागपूरची वाटचाल ‘क्राईम सिटी’कडे सुरू आहे का?

दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी या गुन्ह्यातील जखमी फिर्यादी महिला प्रवाशी यांच्याकडे चौकशी करून तसेच दादर रेल्वे स्टेशनचे व सीएसएमटी रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फूटेज पाहून सदर घटनेतील संशयीत आरोपीस बुध्दीकौशल्याने तपास करून त्यास गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ताब्यात घेतले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman pushed out of moving train while resisting robbery bid in mumbai one held scj