जुहू-कोळीवाडा येथे शनिवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची ओळख पटली नसून तिच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. सांताक्रूझ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सातच्या सुमारास जुहू कोळीवाडय़ाच्या सखाराम गावडे रोडवर स्थानिकांना प्लास्टिकची मोठी बॅग आढळली. ही बॅग रक्ताच्या थारोळ्यात असल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. त्यावेळी त्यात मृतदेह असल्याचे आढळून आले.
मृत महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. या महिलेचे हाथ दोरीने बांधले होते.  तिची ओळख पटेल असे काहीच सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या महिलेची ओळख पटविण्यासाठी आम्ही मुंबई आणि परिसरातील बेपत्ता असलेल्या महिलांच्या तक्रारी तपासणार आहोत, असे सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुधीर कुडाळकर यांनी सांगितले.

Story img Loader