अ‍ॅसिडहल्ल्यात जीव गमावलेल्या प्रीती राठीची दुर्दैवी कहाणी ताजी असतानाच गुरुवारी रात्री रेल्वेगाडीत एका महिलेवर हल्ला झाला. चर्चगेटहून विरारला निघालेली उपनगरी लोकल पावणेदहा वाजता दादर स्थानकात पोहोचली. गाडी सुटत असताना एका तरूणाने महिलांच्या डब्यामध्ये प्रवेश केला. माटुंगा आणि माहीमदरम्यान त्याने चॉपर काढला आणि या महिलेच्या गळ्यावर आणि छातीवर वार केले. हल्ला झालेली महिला चक्कर येऊन खाली कोसळली. वांद्रे स्थानकात गाडीचा वेग कमी झाल्याने हल्लेखोर उडी टाकून फरार झाल्याचे एका महिलेने सांगितले. वांद्रे स्थानकात गाडी थांबल्यावर पोलीस तिला रुग्णालयात घेऊन गेले. पोलिसांनी मात्र, ही महिला दगडफेकीत जखमी झाल्याचा दावा केला. गर्दी असल्याने आम्हाला काहीच कळले नाही, या डब्यात पोलीस नव्हते, असेही या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका तरुणीने सांगितले.

Story img Loader