कायद्यानुसार शनि शिंगणापूर मंदिरात प्रवेश करण्यापासून महिलांना रोखता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. ज्याठिकाणी पुरूष जाऊ शकतात, त्याठिकाणी जाण्याचा समान अधिकार महिलांना आहे.  त्यामुळे महिलांना प्रवेश बंदी करणाऱ्यांवर कारवाई करा. हे आदेश कलेक्टर आणि पोलिसांनाही द्या, असे न्यायालयाने सांगितले. तसेच यासंदर्भात दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार आहे. महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्याऐवजी सर्व ठिकाणी त्यांना सुरक्षितेत प्रवेश द्यावा. महिलांना समान हक्क मिळाले पाहिजेत, असेदेखील न्यायालयाने यावेळी सांगितले.