देशभरातील लैंगिक गुन्ह्य़ाची वाढती प्रकरणे समोर येत असल्याने तरुणींप्रमाणेच त्यांच्या पालकांमध्येही असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर ठोस उपाय सुचण्यासाठी या विषयाच्या मुळाशी जाणे अगत्याचे आहे. या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता-लाऊडस्पीकर’ने ‘स्त्रियांच्या असुरक्षिततेसाठी पुरुषांची लैंगिकता जबाबदार आहे का?’ या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला आहे.
सोमवार १४ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता एक्स्प्रेस टॉवर येथे या परिसंवादाचे आयोजन केले असून त्यात मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग, डॉ. राजन भोसले (सेक्सॉलॉजिस्ट), अॅडव्होकेट जाई वैद्य (कुटुंब व उच्च न्यायालय), अवधूत परळकर (पत्रकार, कार्यकर्ते) आणि वंदना खरे (कार्यकर्त्यां, लेखिका) सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आपल्याला सहभागी व्हायचे असल्यास वा आपल्याला प्रश्न पाठवायचे असल्यास ’lsloudspeaker@expressindia.co येथे अथवा ९८२१९४०४५१ क्रमांकावर संपर्क साधावा.
‘स्त्रियांच्या असुरक्षिततेसाठी पुरुषांची लैंगिकता जबाबदार आहे का?’
देशभरातील लैंगिक गुन्ह्य़ाची वाढती प्रकरणे समोर येत असल्याने तरुणींप्रमाणेच त्यांच्या पालकांमध्येही असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर ठोस उपाय सुचण्यासाठी या विषयाच्या मुळाशी जाणे अगत्याचे आहे.
आणखी वाचा
First published on: 12-01-2013 at 03:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women insecurity is reason of men sexulity