देशभरातील लैंगिक गुन्ह्य़ाची वाढती प्रकरणे समोर येत असल्याने तरुणींप्रमाणेच त्यांच्या पालकांमध्येही असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर ठोस उपाय सुचण्यासाठी या विषयाच्या मुळाशी जाणे अगत्याचे आहे. या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता-लाऊडस्पीकर’ने ‘स्त्रियांच्या असुरक्षिततेसाठी पुरुषांची लैंगिकता जबाबदार आहे का?’ या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला आहे.
सोमवार १४ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता एक्स्प्रेस टॉवर येथे या परिसंवादाचे आयोजन केले असून त्यात मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग, डॉ. राजन भोसले (सेक्सॉलॉजिस्ट), अॅडव्होकेट जाई वैद्य (कुटुंब व उच्च न्यायालय), अवधूत परळकर (पत्रकार, कार्यकर्ते) आणि वंदना खरे (कार्यकर्त्यां, लेखिका) सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आपल्याला सहभागी व्हायचे असल्यास वा आपल्याला प्रश्न पाठवायचे असल्यास ’lsloudspeaker@expressindia.co येथे अथवा ९८२१९४०४५१ क्रमांकावर संपर्क साधावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा