कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना मुंबई महापालिकेतही घडल्या असून तशा तक्रारी महापालिका प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या या तक्रारींची संख्या २२ आहे.  लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडे पीडित महिलांनी तक्रारी दाखल केल्या असून दर महिन्याला किमान २ तक्रारी प्रशासनाकडे येत असल्याची माहिती लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या प्रमुख डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली. दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही डॉ. नागदा यांनी सांगितले.

Story img Loader