जेएसडब्लू समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल यांच्याविरोधात बीकेसी पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल करणारी पीडिता अभिनेत्री असून सदर गुन्हा जानेवारी २०२२ साली वांद्रे-कुर्ला संकुलातील कंपनीच्या पेन्टहाऊसमध्ये घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने त्याच वर्षी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बीकेसी पोलिस ठाण्यात तिची तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे सदर पीडितेला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या निर्देशानंतर आता तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.

पीडितेने आपल्या तक्रारीत पुढे म्हटले की, ऑक्टोबर २०२१ साली दुबई येथे पहिल्यांदा जिंदल आणि तिची भेट झाली होती. आयपीएलचा सामना पाहण्यासाठी गेली असताना मैदानातील व्हीआयपी बॉक्समध्ये दोघांची भेट झाली. त्यानंतर खासदार प्रफुल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात ते दोघे जयपूर येथे दुसऱ्यांदा भेटले. पीडित अभिनेत्रीने सांगितले की, जिंदल यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिच्यावर बळजबरी करण्यात आली. हिंदुस्तान टाइम्स या वृत्तसंकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Maheep Kapoor gatecrashed Sanjay Kapoor party
‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे

हे वाचा >> जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांचा मोदींना पाठिंबा, म्हणाले…

“आम्ही मुंबईत पहिल्यांदा भेटल्यानंतर मोबाइल नंबरची घेवाण-देवाण केली होती. त्यांना माझ्या भावाकडून दुबईमध्ये प्रॉपर्टी विकत घ्यायची होती. माझा भाऊ दुबईमध्ये रिअल इस्टेट कन्सलटंट म्हणून काम करतो. ते मला मेसेजवर आणि फोनवर ‘बेब’ आणि ‘बेबी’ म्हणत असत. जेव्हा आम्ही एकांतात भेटत असू तेव्हा ते मला त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील अडचणी सांगत असत”, असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच प्रत्येक भेटीदरम्यान ते मिठी मारत आणि माझ्याशी फ्लर्ट करत असत, त्यामुळे मला अवघडल्यासारखे वाटत होते.

जिंदल हे विवाहित असूनही मेसेजद्वारे बोलत असताना माझ्याप्रती प्रेमभावना व्यक्त करत होते, असाही दावा करताना पीडितेने तक्रारीत म्हटले की, “ते माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करायचे आणि शारीरिक जवळीक साधायची असल्याचे म्हणायचे. पण हे सर्व काही लग्नानंतरच होऊ शकते, असे सांगून मी त्यांना टाळत होते” जानेवारी २०२२ मध्ये अभिनेत्री जिंदल यांना भेटायला बीकेसीमधील त्यांच्या कंपनीच्या पेन्टहाऊसमध्ये गेली होती. तेव्हा तिच्या प्रखर विरोधानंतरही जिंदल यांनी बळजबरी केली, असा आरोपी पीडितेने केला आहे.

पीडितेने पुढे म्हटले की, जानेवारीत झालेल्या प्रकारानंतर मी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले होते. पण त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले. त्यानंतर जून २०२२ पासून त्यांनी माझा मोबाइल नंबरही ब्लॉक केला. जर मी पोलिसांत जाऊन तक्रार दिली तर मला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीच त्यांनी मला दिली. फेब्रुवारी २०२३ मध्ये मी बीकेसी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. पण पोलिसांनी त्याची दखल न घेतल्यामुळे पीडितेने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यायालयाने बीकेसी पोलिस ठाण्याला सदर तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिले.

बीकेसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्रीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (महिलेवर प्राणघातक हल्ला आणि गुन्हेगारी बळाचा वापर, तसेच महिलेची प्रतिष्ठा भंग करणे) आणि कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) असे कलम दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.