सुन्नी इज्तेमानिमित्त (मेळावा) आझाद मैदानात असलेल्या कार्यक्रमासाठी महिलांना हजर राहता यावे, यासाठी मध्य रेल्वेने शुक्रवारी मुख्य आणि हार्बर या मार्गावर दोन महिला विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाडय़ा मुंब्रा आणि वाशी येथून सुटणार असून प्रत्येक स्थानकावर थांबतील. मुख्य मार्गावरील महिला विशेष शुक्रवारी दुपारी २.२२ वाजता मुंब्य्राहून सुटेल. ही गाडी धीमी असून ती ३.३० वाजता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचेल. तर हार्बर मार्गावरील गाडी दुपारी २.१७ वाजता वाशीहून सुटून ३.०५ वाजता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचणार आहे. महिला प्रवाशांनी अधिकृत तिकीट काढून या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा