वाढत्या महागाईत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे अशक्य झाल्याने आलेल्या नैराश्यातून एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. ममतादेवी रामधनी गौड (४५) असे या महिलेचे नाव असून ती पती व तीन मुलांसमवेत पद्मानगरमध्ये गणेश टॉकीजजवळ राहत होती. वाढती महागाई त्यात पतीही बेरोजगार अशा परिस्थितीत कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे या विवंचनेतून तिने हा टोकाचा निर्णय घेतला. तिला प्रथम भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने नंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. तिथे उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.   

Story img Loader