आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करुन घेतलं आहे. यानुसार लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. महिला आरक्षण विधेयकाची १२८वी घटना दुरुस्ती लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाली तरी प्रत्यक्ष अंमलात येण्याची कालमर्यादा निश्चित नाही. म्हणजेच, २०२४ ला लोकसभा निवडणूक लागण्याआधी या आरक्षणाची अंमलबजावणी होणं शक्य नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसंच, महिला आरक्षण हे जुमला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत त्या बोलत होत्या.
“महिला आरक्षण पूर्णपणे जुमलेबाजी”, विधेयक मांडताना संसदेत घडलेला किस्सा सांगत सुप्रिया सुळेंचा मोठा आरोप
"महिला आरक्षणाच्या विधेयकासाठी पाच दिवस सर्व कामं सोडून आम्ही दिल्लीत गेलो होतो. आम्ही खूप उत्साहाने गेलो होतो. पहिल्या दिवशी जुन्या इमारतीला बाय बाय केलं, दुसऱ्या दिवशी नव्या इमारतीचं वेलकम झालं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Written by स्नेहा कोलते
मुंबई
Updated: या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-10-2023 at 15:44 IST
TOPICSमराठी बातम्याMarathi Newsमहिला आरक्षणWomens ReservationसंसदParliamentसुप्रिया सुळेSupriya Sule
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens reservation is a total hoax supriya sules big allegation recounting the incident in the house while introducing the bill sgk