|| मंगल हनवते

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही

तीन वर्षांत ३० टक्क्य़ांचाच पल्ला, ‘एमएमआरडीए’ला चिंता 

मुंबई : मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रो ४ प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून गेल्या तीन वर्षांत सरासरी केवळ ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. पाच टप्प्यांच्या या प्रकल्पातील तीन टप्प्यांतील कामे चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) चिंता वाढली आहे. 

‘एमएमआरडीए’ने वडाळा ते घाटकोपर- ठाणे- कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. ही मार्गिका २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र कामाला गती नसल्याने ते नियोजित वेळेत पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

३२.३२ कि.मी.च्या आणि १४ हजार ५४९ कोटी खर्चाच्या मेट्रो ४ च्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली. वडाळा ते अमर महल जंक्शन, गरोडिया नगर ते सुर्यानगर, गांधीनगर ते सोनापूर, मुलुंड अग्निशमन केंद्र ते माजिवडा आणि कापूरबावडी ते कासारवडवली अशा पाच टप्प्यांत या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. मात्र चार महिन्यांपासून तीन टप्प्यांतील काम कंत्राटदाराने बंद केले आहे. या तीन टप्प्यांत केवळ १० ते १५ टक्के, तर उर्वरित दोन टप्प्यांचे ४० ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण प्रकल्पाचे तीन वर्षांत केवळ ३० टक्केच काम झाले आहे.  महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी याला दुजोरा दिला.

गाडय़ांच्या बांधणीबाबत मेनंतर निर्णय

२३४ मेट्रो डब्यांचे कंत्राट रद्द झाले आहे. त्याचा या प्रकल्पाला फटका बसणार असून खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. महानगर आयुक्त श्रीनिवास यांनी मात्र ही शक्यता फेटाळली. काम पूर्ण होण्यास दोन वर्षे शिल्लक आहे. कारशेडचा प्रश्न मार्गी लागला आहे, मोघरपाडा येथे कारशेड उभारण्यात येईल. मात्र यासाठीही बराच वेळ आहे. त्यामुळे गाडय़ा उशिराच आणणे योग्य ठरेल. गाडय़ांची बांधणी करण्यासाठी नव्याने कंत्राट काढण्याची घाई न करता मेनंतर याबाबतचा निर्णय घेऊ असे श्रीनिवास म्हणाले.

डब्यांचे कंत्राट रद्द

अशातच मेट्रो ४ साठी २३४ मेट्रो डब्यांची बांधणी करणाऱ्या मे. बॉम्बार्डियर ट्रान्स्पोर्टेशन ऑफ इंडिया आणि मे. बॉम्बार्डियर ट्रान्स्पोर्टेशन, जर्मनी या कंत्राटदार कंपनीने कारशेडची जागा निश्चित नसल्याचे कारण देत डब्यांच्या बांधणीचे कंत्राट रद्द केले आहे. यामुळे ‘एमएमआरडीए’च्या अडचणी वाढल्या आहेत.

तीन टप्प्यांतील बंद असलेल्या कामांबाबत कंत्राटदारांना ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत त्यांनी काम सुरू केले नाही वा कामाची गती वाढवली नाही, तर एप्रिलमध्ये त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कठोर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई कोणत्या स्वरूपाची असेल, हे त्यावेळीच स्पष्ट होईल.  – एस.व्ही.आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए