बहुचर्चित मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील कामांना खिळ बसली असतानाच, केंद्र आणि राज्य सरकारने आता या प्रकल्पाला गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुबंईतील वांद्रे – कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन स्थानकाचा आराखडा, बांधकाम, तसेच २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाच्या कामांसाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमाद्वारे दिली. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने या दोन्ही कामांच्या निविदा रद्द केल्या होत्या.

बुलेट ट्रेन प्रकल्पात सुरुवातीचे पहिले स्थानक वांद्रे-कुर्ला संकुल येथे होणार असून ते भुयारी स्थानक आहे. हे स्थानक ४.९० हेक्टर जागेत उभारण्यात येणार असून त्यासाठी एक हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बोगदा, स्थानक इमारत, अन्य तांत्रिक कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असून १६ बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट आणि प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भुयारी स्थानक उभारण्याचे नियोजन आहे. परंतु या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही.

Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
central railway loksatta
प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…
knight frank report, Private investment Mumbai ,
मुंबईत गृहनिर्मिती क्षेत्रात यंदा साडेतीन हजार कोटींची खासगी गुंतवणूक, ‘नाईट फ्रँक’च्या अहवालातील माहिती
mumbai Eastern Express Highway
पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास अतिवेगवान, १८० मीटरची मिसिंग लिंक पूर्ण; सोमवारपासून मार्ग सेवेत
unauthorized construction, Shri Gopal lal Mandir temple, Mira Road,
मिरा रोड येथे मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

या कामांसाठी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी निविदा काढण्यात येणार होती. परंतु स्थानकाच्या जागेवर करोना केंद्र उभारण्यात आले होते. तसेच त्याच्या जवळच एक पेट्रोल पंप होता. त्यामुळे निविदा खुली करण्याला विलंब झाला आणि निविदेला ११ पेक्षा अधिक वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ७ एप्रिल २०२२ रोजी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ही फेरनिवादाही रद्द करण्यात आली.

स्थानक, भुयारी मार्गाचा आराखडा आणि बांधकामासाठी फेरनिविदा –

या स्थानकापाठोपाठ वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीचा भूयारीमार्ग उभारण्यासाठीही २ मार्च २०२२ रोजी काढलेली निविदा तत्पूर्वीच रद्द करण्यात आली होती. बुलेट ट्रेनसाठी वांद्रे – कुर्ला संकुलातून भुयारी मार्ग जाणार आहे. परंतु येथील जागा एमएमआरडीए आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पाोरेशनला भुयारी मार्गाची निविदाही रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता स्थानक तसेच भुयारी मार्गाचा आराखडा आणि बांधकामासाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Story img Loader