मुंबई : दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे पुत्र कामगार नेते शशांक राव यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राव यांनी हा पक्षप्रवेश केला. मात्र त्यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वाच्या कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना हा पक्षप्रवेश मान्य नसल्यामुळे कामगार संभ्रमात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शशांक राव यांनी ‘दि म्युनिसिपल युनियन’ ही मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी यांची नवीन संघटना स्थापन केली. राव यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट वर्कर्स युनियन आहे, रिक्षा चालकांची संघटना आहे, फेरीवाल्यांची संघटना आहे, दक्षिण मुंबईतील कापड बाजारातील व्यापाऱ्यांचीही संघटना आहे. मात्र त्यांनी हा पक्षप्रवेश करताना कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली नाही, असे दि म्युनिसिपल युनियनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा…मुंबई: पोलीस प्रशिक्षणार्थींच्या जेवणात अळी, संबंधित कॅटरर्सवर कारवाईचे आदेश

महाराष्ट्रदिनी संघटनेने दादर परिसरात नवीन कार्यालय सुरू केले. त्याच्या उद्घाटनाला शशांक राव आले होते मात्र त्यांनी आपला निर्णय सांगितला नव्हता, अशी प्रतिक्रिया दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत राव म्हणाले, भाजप पक्षप्रवेश हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. कामगार संघटनांमधील पदाधिकाऱ्यांना त्याची कल्पना आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worker leader shashank rao join bjp worker organization office bearer not happy with decision workers confused mumbai print news psg