मुंबईतील नोकरदार आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींमधील जवळपास ४५ टक्के महिला धूम्रपान करीत असल्याची धक्कादायक बाब ‘कॅन्सर पेशन्ट एड असोसिशन’ने (सीपीएए) केलेल्या सर्वेक्षणातून उघडकीस आली आहे. गेल्या तीन वर्षांत महिलांनी धूम्रपान करण्याच्या प्रमाणातही १५ टक्क्यांनी वाढ झाली असून १८ ते २७ वयोगटातील महिला या कामाच्या तणावामुळे धूम्रपानाच्या आहारी गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘सीपीएए’ने एका रेडिओ स्टेशनच्या सहकार्याने याबाबत अभ्यास केला. त्यासाठी काही महिलांशी संवाद साधून त्या धूम्रपान कधीपासून करू लागल्या, त्या त्याच्या आहारी का गेल्या, त्यामागची कारणे काय याबाबत हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या वेळी मुंबईतील बऱ्याचशा महिला धूम्रपान करीत असल्याचे आढळून आले. एवढेच नव्हे, तर धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहीत असतानाही धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचेही या सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आले आहे. तीन वर्षांपूर्वी पुरूष आणि महिला यांच्या धूम्रपानाचे प्रमाण ७०:३० असे होते. आता मात्र महिलांचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढून ४५ टक्के झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा