मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या परिसरात ३२० एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे उद्यान साकारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी प्रकल्पाच्या पाहणीच्या वेळी दिली. मुंबई किनारी रस्ता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी वरळी, दादर परिसरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांचीही पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

हेही वाचा >>> वर्षा गायकवाड यांच्यासह १६ पदाधिकारी व ७० आंदोलनकर्त्यांवर गुन्हा, परवानगी न घेता मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्हा

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Devendra Fadnavis, Devendra Fadnavis visit to Nagpur,
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर फडणवीस यांचा पहिला नागपूर दौरा ठरला, स्वागताची जय्यत तयारी
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’
Only 30 percent of road works were completed during the Eknath Shinde government Mumbai news
‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच; शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची ३० टक्केच कामे पूर्ण
Despite success in the assembly elections the future is challenging for Eknath Shinde
विधानसभा निवडणुकीतील यशानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासाठी भविष्यकाळ आव्हानात्मक? दिल्लीतील ‘महाशक्ती’चा पाठिंबा अजूनही? 
Karthik Raju Bazar selected as sub lieutenant in Indian navy saluted his mother after receiving his navy cap
वर्धा : नौदलाची कॅप प्राप्त होताच आईच्या डोक्यावर चढवून केला कडक सॅल्युट
devendra fadnavis takes oath as chief minister of maharashtra for the third time
तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी

सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून लवकरच या प्रकल्पाच्या एका बाजूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जानेवारीपासून या प्रकल्पाच्या उद्घाटनाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाची पाहणी केली. मरिन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास करताना त्यांनी प्रगतिपथावर असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच प्रशासनाला काही सूचनाही केल्या.

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) (अतिरिक्त कार्यभार) संजय कौंडण्यपुरे, उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे आणि इतर संबंधित अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या मुंबई किनारी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्यालगत ३२० एकर जागेत सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. २०० एकर जागेत वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत. हे उद्यान जागतिक दर्जाला साजेसे असेल, असे नमूद करून मुंबई किनारी रस्ता देखील लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असे मुख्यमंत्न्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> केदार शिंदे यांचा ‘आईपण भारी देवा’ लवकरच येणार, जागतिक महिला दिनानिमित्ताने घोषणा

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वरळीमधील गणपतराव कदम मार्ग, सेठ मोतीलाल सांघी मार्ग, दादरमधील दादासाहेब रेगे मार्ग येथे सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांची पाहणी केली. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे मुंबई महानगरातील रस्ते खड्डे मुक्त होतील, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पावसाळ्यातील पाणी शोष खड्ड्यांद्वारे जमिनीत मुरवण्यासाठी काँक्रिटीकरण कामांमध्ये ठराविक अंतरावर रस्त्यांच्या कडेला शोष खड्ड्यांचा समावेश केल्याने ही कामे पर्यावरणपूरक आहेत. तसेच उपयोगिता वाहिन्यांचाही (डक्ट) त्यात समावेश करण्यात आला आहे. परिणामी रस्ते वारंवार खोदावे लागणार नाहीत. त्यातून रस्त्यांचे आयुर्मान व गुणवत्ता वाढेल, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले.

९ मार्च रोजी उद्घाटन

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम सुरू असून प्रकल्पाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची एक बाजू लवकरच सुरू होणार असून ९ मार्च रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने उद्घाटनाची तयारी सुरू केली आहे. वरळी ते मरिन ड्राईव्हपर्यंतची बाजू सुरू करण्यात येणार आहे. अद्याप उत्तर दिशेला म्हणजेच वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेची कामे शिल्लक असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीला केवळ सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेतच वरळी ते मरिन ड्राईव्ह ही नऊ किमीची एक बाजू सुरू राहू शकणार आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी दुसऱ्या बाजूची कामे सुरू राहणार आहेत. तसेच शनिवार, रविवारी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

Story img Loader