Worli Assembly constituency 2024 Aditya Thackeray : वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा (ठाकरे) बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. आदित्य ठाकरे यांनी देखील या मतदारसंघात मोठा विजय मिळवला. मात्र, शिवसेना फुटल्यानंतर या मतदारसंघातील शिवसेनेचा (ठाकरे) दबदबा काहीसा कमी झाला आहे. हा मतदारसंघ लोकसभेच्या दक्षिण मुंबई मतदारसंघात येतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेचं (ठाकरे) मताधिक्य काहीसं कमी झाल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला महायुतीबरोबरच मनसेनेही वरळीत चाचपणी सुरू केल्याने आदित्य ठाकरे सावध झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी युती तोडल्यापासून भाजपाने शिवसेनेच्या (ठाकरे) या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपने रीतसर या विभागात वेगवेगळे कार्यक्रम आखून मराठी माणसाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. वरळीच्या मध्यवर्ती भागात जांभोरी मैदानात दहीहंडीचे कार्यक्रम, मराठी दांडिया असे कार्यक्रम केले. अशातच शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील या मतदारसंघात ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अलीकडेच वरळीतील दोन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे (ठाकरे) अरविंद सावंत निवडून आले खरे, मात्र या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी वरळीतून त्यांना सर्वात कमी म्हणजे सहा हजार इतकेच मताधिक्य मिळाले. हा आदित्य यांच्यासाठी खूप मोठा धक्का असून त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Delhi assembly elections 2025
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार?
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Chandrakant Khaire On Shiv Sena Shinde group
Chandrakant Khaire : ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

हे ही वाचा >> वांद्रे पूर्व विधानसभा : तिकीटवाटवरून मविआ व महायुतीत संघर्ष, उमेदवारांची वाणवा! कशी असतील राजकीय समीकरणं?

वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे?

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीत लोकसभेत घटलेले मताधिक्य आणि बदललेली राजकीय समीकरणे आदित्य ठाकरेंसाठी आव्हानात्मक असतील. मात्र, आदित्य ठाकरेंसमोर महायुती कोणता उमेदवार देणार हे अद्याप ठरलेलं नाही. महायुतीला आदित्य ठाकरेंचा पराभव करायचा असेल तर त्यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देणं गरजेचं आहे. महायुती सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा असलेल्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना या मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरोधात उभं करण्याचाही विचार करत आहे. अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत, तसेच आदित्य ठाकरेंचे चुलत भाऊ देखील आहेत. महायुतीने यापूर्वी बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भायजयीमध्ये सामना रंगवला होता. तसाच प्रयत्न वरळीत देखील होऊ शकतो.

हे ही वाचा >> वांद्रे पश्चिम विधानसभा : आशिष शेलारांचा गड मजबूत, सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर मविआसमोर मोठं आव्हान

महाविकास आघाडीच्या जागावाटपात वरळीची जागा ठाकरे गटाला मिळणार असल्याचं जवळपास निश्चित असून आदित्य ठाकरेच पुन्हा एकदा वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. दरम्यान, महायुतीत या मतदारसंघासाठी शिवसेना (शिंदे) आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे.

वरळी विधानसभेचे आजवरचे आमदार

– १९६२ – माधव नारायण बीरजे (काँग्रेस)

– १९६७ – माधव नारायण बीरजे (काँग्रेस)

– १९७२ – शरद शंकर दीघे (काँग्रेस)

– १९७८ – प्रल्हाद कृष्णा कुरणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) (मार्क्सवादी)

– १९८० – शरद शंकर दीघे (काँग्रेस)

– १९८५ – विनिता दत्ता सामंत (अपक्ष)

– १९९०, १९९५, १९९९, २००४ – दत्ताजी नलावडे (शिवसेना)

मतदारसंघ पूनर्रचनेनंतर

– २००९ – सचिन अहिर (राष्ट्रवादी काँग्रेस)

– २०१४ – सुनील शिंदे (शिवसेना)

– २०१९ – आदित्य ठाकरे (शिवसेना)

ताजी अपडेट

वरळी मतदारसंघात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून एकूण २० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. हे सर्व अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यानुसार शिवसेनेने (ठाकरे) येथून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेने (शिंदे) मिलिंद देवरा यांना उभं केलं आहे. तर, मनसेने येथून यशवंत (संदीप) देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.मुंबई उपनगरांत ५५.७७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Story img Loader