मुंबईः शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) वरळीतील नेत्यांना नेहमीच झुकते माप मिळाल्यामुळे या एकाच मतदारसंघात ठाकरे गटाचे तीन आमदार, दोन माजी महापौर, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अशी नेत्यांची फळी आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेने सरचिटणीस संदीप देशपांडे व शिवसेनेने (शिंदे गट) मिलिंद देवरा यांच्या रुपात कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराची भिस्त या स्थानिक नेत्यावर असून निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासह वरळीतील अनेक स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीमुळे अधिकच चुरस निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Navneet Rana On Uddhav Thackeray :
Navneet Rana : प्रचार सभेत झालेल्या राड्यानंतर नवनीत राणांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; म्हणाल्या, “उद्धव ठाकरे आता जनाब…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mitali Thackeray on womens public toilets
Mitali Thackeray : प्रचारादरम्यान मिताली ठाकरेंना काय जाणवलं? म्हणाल्या, “महिलांशी कनेक्ट झाल्यावर…”
ramdas Athawale raj Thackeray
राज ठाकरेंना महायुतीत यायचे असेल तर आधी…आठवलेंनी सांगितला भविष्यातला प्लॅन…
small girl letter to amit Thackeray
आमच्या भविष्यासाठी अमितकाका तुम्हाला आमदार व्हावेच लागेल, मनसे पदाधिकाऱ्याच्या कन्येचे प्रचारादरम्यान अमित ठाकरेंना पत्र
Mumbai First Aditya Thackeray, Aditya Thackeray,
मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत, ‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका
Sharad Pawar and Raj Thackeray
“मी जातीयवादी असल्याचा पुरावा द्या” म्हणणाऱ्या शरद पवारांना राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले, “जेव्हा पुण्यात…”
The planned city of Navi Mumbai is a disaster Criticism of Raj Thackeray
नियोजनबद्ध नवी मुंबई शहरालाही बकालपणा ! राज ठाकरे यांची टीका

हेही वाचा : अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार

विधानसभेच्या मागील निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते सुनील शिंदे व सचिन अहिर यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. हे दोन्ही आमदार वरळीतील स्थानिक नेते आहेत. त्यामुळे या एका मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) तीन आमदार सध्या प्रचार करीत आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मंत्रीपद, तर सचिन अहिर यांनी राज्यमंत्रीपद भूषवले आहे. याशिवाय स्थानिक पातळीवरही वरळीत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अनेक मातब्बर नेते प्रचार करताना दिसत आहेत. त्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर, तसेच माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर याही आपापल्या विभागात आदित्य ठाकरे यांचा प्रचार करीत आहेत. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) वरळी विभागातील विभागप्रमुख व माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, तसेच माजी नामनिर्देशीत नगरसेवक अरविंद भोसलेही याच मतदार संघातील आहेत. याशिवाय शिवसेनाप्रणित (उद्धव ठाकरे) भारतीय कामगार सेनेचे अनेक पदाधिकारीही याच मतदार संघातील आहेत. या स्थानिक मातब्बर नेत्यांवर वरळी मतदारसंघांतील प्रचाराची भिस्त आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात तीन आमदार, दोन माजी महापौर, एक उपमहापौर, बेस्ट समितीचे अध्यक्ष पद भूषविलेली मंडळी आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेमधील (उद्धव ठाकरे) वरळीतील स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. पण मनसे व शिवसेनेने (एकनाथ शिंदे) यावेळी तुल्यबळ उमेदवार देऊन वरळी मतदारसंघातील लढतीत रंगत आणली आहे.