मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळी बीडीडी चाळ येथे सध्या १२ पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. यातील दोन इमारतींचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तेव्हा काम पूर्ण झाल्यानंतर निवासी दाखला घेत डिसेंबरमध्ये पात्र ५५० रहिवाशांना घराचा ताबा देण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ना.म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीत पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सर्वाधिक १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी बहुमजली ३३ इमारती बांधल्या जाणार आहेत. ३३ पैकी १२ पुनर्वसित इमारतींची कामे सध्या सुरू आहेत. यातील दोन इमारतींचे ८० टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून आता इमारतीतील अंतर्गत कामे सुरू आहेत. ही कामे दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवासी दाखला घेत डिसेंबरमध्ये पात्र ५५० रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचे नियोजन असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा…गंभीर आजार असलेल्या २५८ रुग्णांना जीवदान, राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाकडून पाच महिन्यात १७ कोटी ६९ लाखांची मदत

वरळी बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक ३०, ३१ आणि ३६ मधील पात्र ५५० रहिवाशां उत्तुंग इमारतीतील ५०० चौ फुटाच्या घराच्या ताबा दिला जाणार आहे. तर चार पुनर्वसित इमारतींचे कामही वेगाने सुरू आहे. तेव्हा चार पुनर्वसित इमारतींचे काम मे-जून २०२५ मध्ये पूर्ण होईल. यानंतर या घरांचा ताबा देण्यात येईल असेही या अधिकाऱ्याने सांगितले. एकूणच आता येत्या काही महिन्यात वरळी बीडीडीतील ५५० रहिवाशांचे टॉवरमधील घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

हेही वाचा…पक्षात नाराज असल्याच्या चर्चांवर रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझ्या स्वभावानुसार…”

येत्या आठवड्यात आणखी काही रहिवाशांना मिळणार घराची हमी

वरळी बीडीडी चाळीत सध्या १२ पुनर्वसित इमारतींची कामे सुरू असून आणखी काही पुनर्वसित इमारतींचे काम सुरू करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. यासाठी उर्वरित काही इमारतीतील पात्र रहिवाशांची घरे रिकामी करून घेण्यात येणार आहे. यासाठी येत्या आठवड्यात काही रहिवाशांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे रहिवाशांना पुनर्वसित इमारतीतील घराची हमी देण्यात येणार आहे.