दक्षिण मुंबईतील वरळी भागात बीएमडब्ल्यू कारने एका जोडप्याला धडक दिल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह याचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या अपघातात ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती ५० वर्षीय प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यापासून अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, राजेश शाह हे त्यांच्या मुलाला या अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली आणि दुपारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

पोलिसांनी आज (८ जुलै) वरळी हिट अँड रन प्रकरण न्यायालयासमोर मांडलं. तसेच राजेश शाह यांना न्यायालयासमोर हजर केलं. पोलिसांनी यावेळी अधिक चौकशीसाठी राजेश शाह यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने ही कोठडी मंजूर केली. दरम्यान, शाह यांना कोठडीत नेण्यापूर्वी त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आणि न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या तात्पुरत्या बाँडवर हा जामीन मंजूरही केला.

Rahul Gandhi on Vinayak Damodar Savarkar
Rahul Gandhi: वीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाचे समन्स; ‘या’ तारखेला हजर राहण्याचे आदेश
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
High Court asked the state if there's evidence against Saurabh Tripathi and Ashutosh Mishra
अंगाडिया खंडणी प्रकरण : IPS अधिकरी सौरभ त्रिपाठींविरोधात पुरावे आहेत का? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
Property Rights Of Illegitimate Children in India
अवैध विवाहाच्या अपत्यांचा वारसाहक्क
Rahul Gandhi on veer Savarkar
राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रारीची विशेष न्यायालयात सुनावणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली

अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत राजेश शाह यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह २४ तासांपासून फरार आहे. त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात राजेश शाह आणि त्यांच्या वाहनचालकाला अटक झाली होती. मात्र आता १५,००० रुपयांच्या तात्पुरत्या बाँडवर राजेश शाह यांचा जामीन मंजूर झाला आहे.

राजेश शाह कोण आहेत?

वरळी हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे पालघर जिल्ह्यातील उपनेते आहेत. त्यांचा बांधकामाचं साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच, गोरेगाव भागात त्यांचं घर असून मिहीर शाह त्याच घरात राहतो. मात्र, या अपघातानंतर तो फरार आहे. दरम्यान, राजे शाह आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मुख्यमंत्री व शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी कायद्यासमोर सगळे समान असल्याचं सांगत योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.

हे ही वाचा >> Worli Hit and Run Case: अपघाताआधी मिहीरनं जुहूच्या बारमध्ये १८,७३० रुपयांचं बिल भरलं होतं; मित्रांसोबत पार्टीचं CCTV फूटेज पोलिसांच्या हाती!

वरळी हिट अँड रन प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी रविवारी चौकशीसाठी राजेश शाह यांना ताब्यात घेतलं. मिहीरला पळून जाण्यासाठी मदत केल्यामुळे, तसेच त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मात्र आज पोलिसांनी राजेश शाह यांचा जामीन मंजूर केला.