मुंबई : मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून वरळी मतदारसंघात विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार आदित्य ठाकरे यांना विरोधकांनी अनोखे आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्यकर्त्यांनी वरळीत ठिकठिकाणी ठाकरे यांना भविष्याच्या चर्चेचे आव्हान दिले आहे. अशी पत्रके लावलेल्या खुर्च्या जागोजागी ठेवल्या आहेत.

आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) खासदार मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. वरळीमधील अनेक ठिकाणी रविवारी सकाळी काही विशिष्ट मजकूर लिहिलेल्या खुर्च्या निदर्शनास आल्या. वरळीच्या भविष्याच्या चर्चेचे आव्हान आदित्य स्वीकारणार का असा सवाल करणाऱ्या या खुर्च्या लक्ष वेधून घेत होत्या.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?
cm devendra fadnavis mns chief raj thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”
abhijeet kelkar post for CM devendra Fadnavis
“एक दिवस असाही येईल, जेव्हा देवेंद्रजी आपल्या देशाचे…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट; तर प्रवीण तरडे म्हणाले…
Story img Loader