मुंबई : वरळी येथे कावेरी नाखवा यांना मोटरगाडीने धडक देण्यापूर्वी आरोपी मिहीर शहाने मालाड येथील बिअर बारमधून बिअर खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बारमधील कर्मचाऱ्याचा जबाब वरळी पोलिसांनी नोंदवला आहे. वरळी पोलिसांचा तपास व सीसीटीव्ही चित्रणानुसार गिरगावपासून अपघात होईपर्यंत, तसेच तेथून पुढे वांद्रे – वरळी सागरी सेतूपर्यंत मिहीरच मोटरगाडी चालवत होता. दरम्यान, याप्रकरणी शहा कुटुंबियांचा चालक राजऋषी बिडावत याची पोलीस कोठडी संपल्यामुळे गुरुवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

जुहू येथे मद्यप्राशन केल्यानंतर मिहीर शहाने मालाड येथील साईनाथ बारमधून बिअरचे चार टीन खरेदी केले. याप्रकरणी बिअर बारमधील एका वेटरच्या जबाबतून त्याला पुष्टी मिळाली आहे. मिहीरला ५०० मिलीचे चार टीन दिल्याचे या वेटरने सांगितले. त्यावेळी बोरिवली येथील मिहीरच्या घरापासून मरिन ड्राईव्हपर्यंत चालक राजऋषी बिडावत मोटरगाडी चालवत होता. तेथे मिहीरने मोटरगाडी थांबवण्यास सांगितले व गिरगाव चौपाटीपासून मिहीर मोटरगाडी चालवू लागला. त्यानंतर रविवारी सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी त्याने प्रदीप नाखवा व त्यांची पत्नी कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला वरळी येथील लँडमार्क शोरूसमोर धडक दिली. तेथून कावेरी यांना फरफटत नेले. मिहीरने सागरी सेतूच्या आधी मोटरगाडी थांबवली. त्यानंतर बिडावत व मिहीर दोघाही मोटरगाडीतून खाली उतरले. त्यांनी मोटरगाडीखाली अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढले व मोटरगाडीसमोर ठेवले. त्यानंतर बिडावत चालकाच्या आसनावर बसला. त्यावेळी बिडावतनेही कावेरी यांच्या अंगावरून मोटरगाडी नेली. त्यानंतर दोघेही वांद्रे येथील कलानगर परिसरात मोटरगाडीने गेले. दोन्ही आरोपींना वरळी पोलिसांनी घटनास्थळी नेऊन तपास केला. याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

shashank ketkar shares angry post after seen garbage on the road
“ठाणे महानगरपालिका झोपलीये…”, कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकर संतापला! म्हणाला, “दारूच्या बाटल्या, तंबाखू…”
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Baba Siddique murder case, Accused arrested from Ludhiana, Baba Siddique latest news, Baba Siddique marathi news,
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : आरोपीला लुधियानातून अटक
Woman hit a man at petrol pump accident viral video on social media
बिचाऱ्याची काय चूक? स्कूटी चालवताना थेट पेट्रोल पंपावरच धडकली अन्…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात
thane hit and run
ठाणे: हीट अँड रन प्रकरणातील मर्सिडीज अवघ्या ‘पावणे चार लाखा’ची, २००८ चा मॉडेलची मोटार आरोपीने केली होती खरेदी
kapil honrao replied to trolls
“वीट आलाय या लोकांचा…”, ‘करवा चौथ’वरून ट्रोल करणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सुनावलं, वस्तुस्थिती सांगत म्हणाला…
The case revolved around the the alleged assassination plot of pro-Khalistan separatist Gurpatwant Singh Pannun.
अमेरिकेने आरोप केलेला ‘रॉ’चा गुप्तचर अधिकारी विकास यादव आहे तरी कोण?
Vikas Yadav
Vikash Yadav: पन्नूनच्या हत्येच्या कटात भारत सरकारच्या कर्मचाऱ्याचा सहभाग- अमेरिकेचा आरोप; दिल्लीत यादवला अटक का करण्यात आली होती?

हेही वाचा – मुंबई : विनातिकीट प्रवाशांवर बडगा, ५२ कोटी रुपये दंड वसूल

हेही वाचा – ‘सीए’ अभ्यासक्रमाच्या अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर

बिडावतची पोलीस कोठडी गुरुवारी संपत असल्यामुळे त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील रवींद्र पाटील व भारती भोसले यांनी सराकारी बाजू मांडली. आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे, मालाड येथील खरेदी केलेले बियरचे टीन आरोपींनी कोठे फेकले याचा तपास करायचा आहे, मोटरगाडीची नंबरप्लेट कोठे फेकण्यात आली, घटनाक्रम जाणून घेण्यासाठी याबाबतचा क्राईम सीन तयार करायचा असल्यामुळे बिडावतला पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. त्याला बचाव पक्षाने विरोध केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने बिडावतला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी या प्रकरणी मिहीर शाहचे वडील राजेश शाह यांना अटक करण्यात आली होती. राजेश शाह यांना न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.