मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला आता अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Hit and Run Case : अपघातानंतर महिलेला दीड किमी नेलं फरफटत अन् अंगावर…! CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी मिहीर शाह याला शहापूरमधून अटक केली आहे. याशिवाय त्याची आई आणि बहिणीला सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्याला आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा असल्याचं सांगितले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

रविवारी पहाटे (७ जुलै रोजी) बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली होती. या धडकेनंतर चालकाने महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ हा अपघात घडला होता. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात हे दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉकला मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना ही घटना घडली होती.

हेही वाचा – Worli hit and Run: वरळीतल्या त्या भयंकर अपघाताच्या आधी काय काय घडलं? काय होता घटनाक्रम?

दरम्यान, या अपघातापूर्वी मिहीर रात्री शाहाने जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचं आहे, तो चालकाला घेऊन पुन्हा घराबाहेर पडला. प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात पोहोचला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या अपघातानंतर मिहीर शाहनं अपघाताच्या स्थळावरून पळ काढला होता. तेव्हापासून तो फरार होता. त्याला आता अटक करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worli hit and run case update mihir shah arrested spb
Show comments