Worli Murder Case Updates : वरळी येथे एका ५० वर्षीय व्यक्तीची गळा चिरून निर्घूण हत्या करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे झालेल्या हत्या थरारप्रकरणी पोलिसांनी सहा पथके तैनात केल असून मृतदेह सापडला आहे. तर या प्ररकणातील मुख्य साक्षीदार असलेल्या महिलेसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर, याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणालाही अटक करण्यात आली आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

विलेपार्ले पोलीस ठाण्यात किमान पाच गुन्हे दाखल असलेला गुरुसिद्धाप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे हा त्याच्या मैत्रिणीबरोबर वरळी नाक्याजवळील सॉफ्ट टच स्पामध्ये गेला होता. त्याआधी त्यांनी सायन रेल्वे स्थानकाजवळील अपर्णा बार अँन्ड रेस्टॉरंटमध्ये मद्यपान केले होते.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?

वरळी नाक्यावरील मांजरेकर इमारतीच्या तळमजल्यावर असलेला स्पा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. परंतु, या स्पाचा मालक चुलबुल पांडेच्या मैत्रिणीचा खास मित्र असल्याने त्यांनी हा स्पा त्यांच्यासाठी खुला करून दिला. हे दोघे स्पामध्ये व्यस्त असताना चाकू आणि चॉपर घेऊन आलेल्या तीन अज्ञातांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि सोफ्यावर झोपलेल्या वाघमारेवर थेट हल्ला केला. या हल्ल्यात चुलबुल पांडे जागीच मृत झाला.

हेही वाचा >> अमलीपदार्थ तस्करीचे प्रकरण : ममता कुलकर्णीविरोधातील गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

पोलिसांपर्यंत कशी पोहोचली खबर

बुधवारी सकाळी हा थरार घडल्यानंतर दुपारी वरळी पोलीस ठाण्यात फोन आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. २४ जुलै रोजी सॉफ्ट टच स्पामध्ये एक मृतदेह सापडला असल्याची माहिती फोन करणाऱ्याने पोलिसांना दिली. मुख्य साक्षीदार असलेल्या महिलेला एका पुरुषासह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची नावे पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाहीत. आरोपींना पकडण्यासाठी वरिष्ठ पीआय रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.

“या घटनेबाबत दुपारी पोलिसांना फोन आला. आम्ही घटनास्थळी धाव घेतली आणि आम्हाला मृतदेह दिसला. आम्ही तत्काळ जवळच्या रुग्णालयात गेलो असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. त्याआधारे आम्ही एफआयआर नोंदवला आहे आणि आरोपींना पकडण्यासाठी शोध सुरू केला आहे. चुलबुल पांडेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे”, असं पोलिसांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील

आरोपींना पकडण्यासाठी वरळी पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणार आहेत. “या जोडप्यावर कोणीतरी पाळत ठेवून हल्ला केल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट होत आहे. हा सुनियोजित कट आहे”, असंही एका अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी कलम १०३(हत्येसाठी शिक्षा) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या इतर संबंधित कलमांनुसार अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या कलमांखाली दोषी ठरलेल्यांना मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाते.